वाहतूक पोलीस कॅमेरासज्ज

वाहतूक पोलिसांसाठी सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवणारे कॅमेरे : मिरा-भाईंदर, वसई-विरार (MBVV) पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागात डिजिटल युगातील तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक पोलीसांना अधिक प्रभावीपणे आपले कर्तव्य पार पाडता यावे यासाठी एक महत्त्वपूर्ण, नाचिन्यपूर्ण व तंत्रस्नेही उपक्रम दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी मा. श्री. मधुकर पांडेय (भा.पो.से.), पोलीस आयुक्त, यांच्या शुभहस्ते सुरू करण्यात आले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, २० बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचे (BWC) वितरण वाहतूक विभागातील अधिकारी व अंमलदारांना करण्यात आले. एकूण २०० बौडीवॉर्न कैमेन्यांचे वाटप विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असून, यामुळे पोलीस कार्यपद्धती अधिक पारदर्शक, जबाबदारीपूर्ण आणि कार्यक्षम होणार आहे. बॉडी वॉर्न कॅमेरे हे पोलीस कर्मचाऱ्यांच्या छाती, खांद्यावर किंवा कमरेवर परिधान करता येणारे लहान, अत्याधुनिक उपकरण असून, हे घटनास्थळी थेट व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग करण्यास सक्षम आहे. आधुनिक पोलीसिंगसाठी हे एक अत्यावश्यक साधन ठरत आहे. या कॅमेऱ्यांचा वापर व फायदे: * पोलीस व नागरिकांमधील संवादाची नोंद * कायद्याची अंमलबजावणी व कारवाईचे दस्तऐवजीकरण * तात्काळ प्रतिसाद पथकांना थेट माहितीची उपलब्धता * आपत्कालीन परिस्थितीत पोलीसांचे लोकेशन ट्रॅकिंग * महामार्ग, वाहतूक जंक्शन आणि संवेदनशील ठिकाणी थेट रेकॉर्डिंग * वाहतूक नियम उल्लंघनासंबंधी विश्वासार्ह पुरावे संकलन मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय हे तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा देण्यास कटिबद्ध आहे. आधुनिक साधनांचा वापर करून पोलीस यंत्रणा अधिक सक्षम, उत्तरदायी व नागरिकाभिमुख करण्याचा हा एक ठोस आणि पोलिस-जनता संबंध मजबुत करणे आहे.