बेवारस वाहने

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाणे यामधील एकूण 900 बेवारस वाहनांची निर्गती मा. मुख्यमंत्री यांचे 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत निर्गती करण्यात आलेली आहे. बेवारस वाहने निर्गती रक्कम रु. 63,18,800/- हे शासन जमा करण्यात आलेली आहे.

सद्यःस्थितीत मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयात आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे, वाहतूक शाखा व ईतर शाखा यांचेकडे एकुण 333 बेवारस वाहने जमा असुन त्यांचे उप प्रादेशिक परीवहन विभागाकडून मुल्यांकन करुन घेतलेले आहे, बेवारस वाहनांची निर्गती आदर्श कार्यपध्दतीप्रमाणे करण्याची कार्यवाही चालू आहे.

बेवारस वाहनांची यादी पोलीस आयुक्तालयाच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येत आहे. बेवारस वाहनांचा नोंदणी क्रमांक व चेसिस क्रमांक आहे पोलिस आयुक्तालयाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

खालील बेवारस वाहनांबाबत कोणास मालकी हक्क सांगावयाचा असेल तर त्या व्यक्तीने संबंधित वाहनांच्या मूळ कागदपत्रांसह वाहन ताब्यात घेण्यासाठी यादीतील संबंधित पोलीस ठाण्याशी प्रत्यक्ष भेटून संपर्क साधावा आणि वाहन ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी. तद्नंतर सदरची वाहने ही बेवारस असल्याचे घोषित करुन त्याचा लिलाव करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक कार्यालयाशी 8655727612 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

बेवारस वाहने

तारीख शीर्षक माहिती
No records found.
instagram