About Us
परवाना शाखा ही नागरीकांना सेवा पुरविणारी पोलीस आयुक्त कार्यालयातील एक महत्वाची शाखा आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय हद्दीतील नागरीकांना नवीन अग्निशस्त्र परवाना मंजुर करणे, शस्त्र खरेदीची परवानगी, नुतनीकरण, ब्लास्टींगची परवाना, ऑर्केस्ट्रा परवाना, कायम स्वरुपी फटाका परवाना, विविध परवाने नुतनीकरण करणे इत्यादी कामकाजाच्या माध्यमातुन सेवा प्रदान केली जाते.
परवाना शाखेचे कामकाज पोलीस उपायुक्त (मुख्यालय) यांच्या अधिपत्या खाली व मार्गदर्शनाखाली चालते.
परवाना शाखेतील कामकाज व कक्ष :-
टेबल 01 : नवीन शस्त्र (पिस्तोल/ रिव्हॉल्वर) परवाना देणे, गुन्हे/ आक्षेपार्ह नोंदी असलेले शस्त्र परवाना नुतनीकरण, शस्त्र परवाना रद्द करणे.( (पिस्तोल/ रिव्हॉल्वर), शस्त्र परवाना क्षेत्र वाढविणे, नवीन शस्त्र (बंदुक/रायफल) परवाना देणे, शस्त्र परवाना रद्द करणे. (बंदुक/रायफल), बाहेरील जिल्हयातुन येणारे परवाना धारकांना शस्त्र परवाना नोंदणी करणे, शस्त्र खरेदी-विक्री, हस्तांतरण/ बक्षीस देणे, काडतुसांची संख्येत वाढ करणे, दुबार शस्त्र परवाना देणे, शस्त्र परवानावरील वास्तव्याच्या पत्त्यात बदल करणे, शस्त्र बाहेरील राज्यात घेवुन जाण्यासाठी तात्पुरता प्रवास परवाना देणे, बाहेर राज्यात शस्त्र खरेदी करण्यासाठी नाहरकत दाखला देणे, नियमित नुतनीकरणास विलंब असलेले शस्त्र परवाना नुतनीकरण,शस्त्र ारेदीस मुदतवाढ देणे, शस्त्र परवाना धारकास बाहेरील जिल्हयातील नोंदणीसाठी नाहरकत दाखला देणे, शस्त्र परवान्यावर अनुसेवाधारकांची नोंद घेणे, ब्लास्टींग करिता नाहरकत दाखला देणे, सल्फर साठा करणे, वापर करणे करिता नवीन परवाना देणे, सल्फर साठा परवाना नुतनीकरण.
टेबल 02 : हॉटेल व इतर परवाने :-पेट्रोल पंप/ एलपीजी/ सीएनजी नाहरकत दाखला देणे, एफ.एल.3, सी.एल-3 नाहरकत दाखला, एफ.एल.3, सी.एल 3, बिअर शॉप अनुषंगाने वर्तणुक चारित्र्य पडताळणी, नवीन ऑकेस्ट्रा परवाना मंजुरी, नुतनीकरण, ऑकेस्ट्रा परवाना रद्द, नवीन चित्रपट गृह परवाना, चित्रपट गृह परवाना नुतनीकरण, कायमस्वरूपी फटाका परवाना देणे, नुतनीकरण, सार्वजनिक मनोरंजनाशी निगडीत इतर परवाने.