नियंत्रण कक्ष

About Us

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणेकरीता पोलीस नियंत्रण कक्षाची महत्वाची भुमिका असते. नियंत्रण कक्ष येथे संपूर्ण आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाणे येथील दाखल गुन्ह्याच्या दैनंदिन आढावा घेणे तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या घटना गुन्हे ,अपघात व महत्त्वाच्या व अति महत्त्वाच्या व्यक्तीचे आगमन निर्गमन, समाजातील जेष्ठ व गरजू ,लहान मुले /मुली सर्वांना त्याचे मागणीनुसार योग्य ती पोलीस मदत देणे .तसेच संभाव्य घटना इत्यादीचा आढावा घेण्यात येऊन त्या आधारे संक्षिप्त स्वरूपातील माहिती माननीय वरिष्ठांना सादर करणे व वरिष्ठांचे आदेश संबंधितांना पाठवून त्याप्रमाणे शासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यास मदत करणे.

नियंत्रण कक्षात फोन ड्युटी रजिस्टर, डायल 112 रजिस्टर ,ठाणे दैनंदिनीं, हजेरी रजिस्टर, पि. पी हायकोर्ट रजिस्टर, एल .ए. क्यू. रजिस्टर, तसेच आवक जावक रजिस्टर संपूर्ण आयुक्तालयात वरिष्ठ आणि कनिष्ठा मध्ये योग्य असा समन्वय ठेवणे ही मुख्य काम नियंत्रण कक्षा कडून केले जाते. डायल 112 चा दैनंदिन अहवाल माननीय पोलीस आयुक्त ,पोलीस उपायुक्त (मुख्यालय ),सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना पाठविण्यात येते तसेच आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही कॅमेरा चालू किंवा बंद आहे याची दैनंदिन माहिती घेतली जाते सदरचा अहवाल दररोज ई -ऑफिस मार्फत माननीय वरिष्ठांना सादर करण्यात येत असतो. तसेच आयुक्तालय अंतर्गत असणाऱ्या पोलीस ठाणे न्याय मनुष्यबळाची माहिती संकलित करून माननीय वरिष्ठांना सादर केली जाते तसेच नियंत्रण कक्षे येथे करण्यात येणारे महत्त्वाचे कामकाज डीसीआर ,एम पी आय एस,फोन ड्युटी ,सीआरओ ड्युटी, कार्यालयीन कामकाज ,कारकून/ बारनिशी, जनरल ड्युटी अमलदार ,आयुक्तालय रात्रगस्त नियोजन व देखरेख, अधिवेशन कक्ष ,मनुष्यबळ, सीसीटीव्ही, ई बीट पंचिंग बाबत माहिती तसेच त्याचबरोबर संपूर्ण आयुक्तालयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांचे तसेच बीट मार्शल यांची लोकेशन घेणे, पोलीस आयुक्ताचे अंतर्गत आयुक्तालय रात्रगस्त, दरोडा प्रतिबंधक रात्रगस्त-०१ दरोडा प्रतिबंध रात्रगस्त-०२ अशाप्रकारे माननीय वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रोगस्तीचे नियोजन करून अंमलबजावणी करण्यात येते. त्या अनुषंगाने नियंत्रण कक्षा मार्फत योग्य ती दैनंदिन महत्त्वाची कामगिरी नियंत्रण कक्षाकडून बिनचूक पार पडली जात आहे 

 

दूरध्वनी क्रमांक:- 7021995352


ईमेल आयडी:- cp.mb-vv.cro@mahapolice.gov.in