About Us
पोलीस मोटार परिवहन विभागाच्या कार्यक्षेत्रात शासकीय पोलीस वाहने व सागरी वाहने (बोटी) यांचे नियोजन व वितरण हे महत्त्वाचे कार्य आहे. विभागाची प्रमुख जबाबदारी पुढीलप्रमाणे आहे:
1. शासकीय पोलीस वाहने व सागरी वाहने (बोटी) यांचे नियोजन व वितरण: विभागाच्या गरजेनुसार पोलीस ठाणे, शाखा व युनिट्स यांना वाहने योग्यप्रकारे वाटप करणे.
2. चालकांचे नियोजन: प्रत्येक शासकीय पोलीस वाहनासाठी योग्य, प्रशिक्षित व अनुभवी चालकाची नियुक्ती करणे.
3. वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचे व्यवस्थापन: शासकीय पोलीस वाहनांची वेळोवेळी तपासणी, देखभाल आणि आवश्यक दुरुस्ती करणे.
4. इंधन व्यवस्थापन: पोलीस वाहनांना गरजेप्रमाणे इंधन वाटप करणे व त्यासंबंधीचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे.
5. दुरुस्ती व इंधन देयक प्रक्रिया: शासकीय पोलीस वाहनांच्या दुरुस्ती व इंधनासाठी लागणाऱ्या खर्चाचे देयक तयार करणे व संबंधित विभागाकडे सादर करणे.
6. वाहनांची अद्ययावत नोंद: सर्व शासकीय पोलीस वाहने कार्यक्षम स्थितीत राहतील यासाठी त्यांची नियमित तपासणी करणे आणि आवश्यक त्या सुधारणा करणे.
7. नवीन वाहन प्रस्ताव: गरजेनुसार नवीन शासकीय पोलीस वाहने खरेदी करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे व सादर करणे.
8. निष्क्रिय वाहनांचे निकामीकरण: जुन्या, खराब किंवा निकामी झालेल्या वाहनांसाठी निकामीकरण प्रस्ताव तयार करणे व आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करणे.
9. शासनास आवश्यक अहवाल व उत्तर प्रदान करणे: शासनाच्या विविध स्तरांवरून वाहनांशी संबंधित येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे वेळेवर देणे.
10. वाहन अभिलेखांचे व्यवस्थापन: सर्व शासकीय पोलीस वाहनांचे दस्तऐवज अद्ययावत ठेवणे व ऑनलाईन प्रणालीद्वारे त्यांची नोंद राखणे.
वरील सर्व कार्ये पोलीस मोटार परिवहन विभागाच्या कार्यक्षेत्रात येतात आणि विभागाच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. .
दूरध्वनी क्रमांक:- 9823112469
ईमेल आयडी:- acphq.mb-vv@mahapolice.gov.in