वाहतूक शाखा

About Us

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये वाहतुक नियमन व नियंत्रण या करीता स्वतंत्र वाहतुक शाखा स्थापन करण्यात आली आहे. सदर शाखेच्या अंतर्गत संपूर्ण आयुक्तालयामध्ये विविध ठिकाणी एकुण ३ वाहतुक विभाग कार्यरत असुन वाहतुक नियंत्रण व नियमनाकरीता आपापले कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाअंतर्गत कार्यरत असलेला वाहतुक विभाग मा.पोलीस उपआयुक्त वाहतुक यांचे पर्यवेक्षण व देखरेखीखाली काम करतो. धार्मिक सण, उत्सव, मिरवणूका, महत्वाच्या व अतिमहत्वाच्या व्यक्तींचे दौरे तसेच इतर कार्यक्रमांच्या अनुषंगाने शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन व व्यवस्था करण्यात येते. 

  • विशेष प्रसंगी आणि व्ही. आय. पी. कर्तव्ये पार पाडण्यासाठी लोकांना कमीत कमी गैरसोय होईल अशी वाहतूक सुरळीत आणि सुरक्षितपणे व्हावी.
  • वाहतुकीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी.
  • रस्ते वापरणाऱ्यांमध्ये शिस्तीची भावना रुजवा आणि शालेय मुलांसह नागरिकांना रस्ते सुरक्षेबाबत शिक्षित करा.
  • वाहतुकीच्या सुरळीत आणि सुरक्षित प्रवाहाची सर्वोच्च मानके साध्य करणे.
  • रस्ते अपघात रोखणे आणि कमी करणे.
  • वाहतूक व्यवस्थापनामध्ये जनतेचा सहभाग आणि सहभागाला प्रोत्साहन देणे.