आर्थिक गुन्हे शाखा

About Us

आर्थिक गुन्हे विभाग 

आर्थिक गुन्हे शाखा येथील कामकाज मा.पोलीस उपायुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली आहे.

तसेच हौसिंग युनिट, बँकिंग युनिट, MPID युनिट, जनरल चीटिंग युनिट हे विभाग आहेत. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत पोलीस ठाण्यात दाखल होणारे ३ करोड रुपयाचे वरील फसवणुकीचे गुन्हे हे मा वरिष्ठांचे आदेशाने आर्थिक गुन्हे शाखे कडे पुढील तपासकामी वर्ग केले जातात.

गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम हि मोठ्या स्वरूपातील असल्याने व गुन्हे क्लीष्ट व गुंतागुंतीचे असल्याने नमूद गुन्ह्यातील आरोपी व त्यांचे कंपन्यांची बँक खात्याची माहिती व इतर माहिती प्राप्त करून आरोपी विरुद्ध पुरावे प्राप्त करून त्यांना अटक करून त्यांच्ये कडून अपहरित रक्कमे बाबत माहिती घेऊन आरोपीने अपहरित रकमेतुन विकत घेतलेली मालमत्ता,तसेच बँकेतील जमा रक्कम MPID कायद्या अंतर्गत संरक्षित केली जाते.

संरक्षित मालमतेचा MPID कायद्या प्रमाणे अधिसूचना निघणे करिता मा जिल्हाधिकारी व मा. अपर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे शाखा महाराष्ट्र राज्य मुंबई याना प्रस्ताव पाठविला जातो. आरोपी विरुद्ध पुरावे प्राप्त करून वरिष्ठांची मंजुरी घेऊन त्यांचे विरुद्ध दोषारोप पत्र पाठवले जाते.


ईमेल आयडी:- pi.eow.mb-vv@mahapolice.gov.in