Blogs | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

ऑनलाइन एफ आय आर बाबत




initiativesimg

    असे म्हणतात की पोलिस स्टेशनची पायरी चढू नये. जर गुन्हा आपण घडताना पाहिला किंव्हा एका गुन्ह्याची तक्रार आपल्यावर करण्याची पाळी आली तर मग काय? गुन्हे दोन प्रकारचे असतात – 1. अदखलपात्र गुन्हा आणि 2. दखलपात्र गुन्हा अदखलपात्र गुन्हा- म्हणजेच फारसे गंभीर नसलेले गुन्हे, हे खाजगी स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ फसवणूक, त्रास देणे, सार्वजनिक उपद्रव इत्यादी. या स्वरूपाच्या गुन्ह्यात कोणताही पोलिस अधिकारी न्यायदंडाधिकारी यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करू शकत नाही. दखलपात्र गुन्हा - म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उदाहरणार्थ चोरी, बलात्कार, हत्या, खंडणी, इत्यादी. या स्वरूपाच्या गुन्ह्यात एफआयआर दाखल करणं गरजेचं असतं. आज आपण जाणून घेऊया तक्रार नोंदवण्याचा काही पद्धती- 1. तक्रार धारक फोनवरून तक्रार दाखल करू शकतात. एखाद्याला एखाद्या प्रकरणाची तक्रार करायचे असल्यास ते 112 वर डायल करून पोलिसांना कॉल करू शकतात. 2. तक्रार पोलीस ठाण्यात जाऊन नोंदवणे. 3. तक्रार ऑनलाईन पद्धतीने नोंदवणे. ही तक्रार केव्हा/एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) कोण व कसा दाखल करू शकतो. गुन्ह्यात पीडित असलेल्या व्यक्तीकडून किंवा त्यांच्या वतीने एखादी व्यक्ती ही तक्रार नोंदवू शकते. ही तक्रार नोंदवताना काही आवश्यक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. गुन्ह्याची माहिती तोंडी किंवा लेखी स्वरुपात जवळच्या पोलिस ठाण्यात व्यक्तिशः जाऊन दाखल करणे. ती तक्रारधारकांनी तोंडी स्वरूपात दिली असल्यास, रेकॉर्ड बुक मध्ये लेखी स्वरुपात पोलिसाने दाखल करून घेणे क्रमप्राप्त आहे. त्या एफआयआर वर तक्रारधारकाची रेकॉर्ड केलेल्या माहितीची एक प्रत तक्रार धारकाला पोलिसांनी देणे बंधनकारक आहे. आता हीच तक्रार, तक्रारधारक ठाण्यात न जाता ऑनलाइन पद्धतीने नोंदवू शकतो. ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवण्याचे अनेक फायदे आहेत. सध्या, ऑनलाइन तक्रार नोंदवणे ही सर्वात सुरक्षित आणि सोयीची पद्धत आहे. तक्रार नोंदविण्यासाठी किंवा एफआयआर दाखल करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल वापरणे सोपे आहे. वेबसाइटवरील पर्याय देखील समजणे सोपे आहे. ई-कॉपी ईमेलमध्ये सुरक्षित राहते आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा सहज आपणास उपलब्ध होते. ऑनलाइन पोर्टलकडे तक्रारीची सद्यस्थिती तपासण्यासाठी एक विभाग आहे. एफआयआरची एक प्रत तक्रारदाराने दिलेल्या ईमेल पत्त्यावर पाठवली जाते. म्हणून, तक्रारदाराने तक्रार नोंदवताना एक कार्यरत ईमेल पत्ता आणि / किंवा त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप संपर्क निश्चित देणे आवश्यक आहे. गुन्ह्याची ऑनलाईन तक्रार नोंदवणे अधिक सोयीचे आहे व ते स्वस्त आहे. अशी उदाहरणे आहेत की पोलिस अधिकारी तक्रार घेण्यास नकार देतात. अशा प्रथा टाळण्यासाठी, ऑनलाइन तक्रार नोंदवणे चांगले आहे कारण ते नेहमीच रेकॉर्डवर असते. ते पोलिस हटवू शकत नाहीत. जे पोलीस अधिकारी आपली कर्तव्य बजावत नाहीत त्यांना काम करण्यास ऑनलाइन तक्रार भाग पाडू शकते. आणि तक्रारदारास यावर त्वरित उपाय मिळतो. आता ही ऑनलाइन तक्रार कशी केली जाऊ शकते हे आपण जाणून घेऊयात. ऑनलाइन तक्रार करण्यासाठी राज्य पोलीस वेबसाईटवर आणि वेबसाईट वरील दर्शविलेल्या सूचनांचे पालन करणे. आपल्या माहितीकरता मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांची वेबसाईटची लिंक खालील प्रमाणे आहे. https://www.mbvv.mahapolice.gov.in हा ईमेल वरिष्ठ पोलिस अधिकायास उद्देशून असावा. ही एफआयआर नोंदवताना, गुन्हा घडलेली नेमकी जागा, नेमका हा गुन्हा कधी घडला ती नेमकी वेळ, माहिती असल्यास गुन्हेगाराचे नाव, नाव माहिती नसल्यास त्याचे अचूक वर्णन, गुन्हा घडताना आजूबाजूला कोण व किती माणस होती त्याचा तपशीलवार व अचूक वर्णन, हा गुन्हा कोणत्या स्वरूपाचा होता इत्यादी. हे तपशीलवार लिहिणे आवश्यक आहे. प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र पोलीस वेबसाईट आहे. सध्या गुन्हा नोंदवण्याची ऑनलाइन पद्धतीत ही सर्वात सुरक्षित आणि सोयीची आहे. ऑनलाईन एफ आय आर दाखल केल्यानंतर एफआयआर ची प्रत तक्रार धारकांना इमेल पत्त्यावर पाठवली जाते. आणि त्यासाठी तक्रार धारकांना तक्रार नोंदविताना एक कार्यरत ईमेल पत्ता आणि /किंव्हा त्यांचे व्हाट्सअप दूरध्वनी संपर्क देणे आवश्यक आहे. आता एफआयआर नोंदवणे सोपे झाले आहे. चला सुशासनासाठी एकत्र होऊया. या ब्लाॅगवरील सर्व माहिती चांगल्या हेतूने आणि केवळ सामान्य नागरीकांच्या माहितीसाठी प्रकाशित केली गेली आहे. लेखन- ॲड अलोका नाडकर्णी