आमच्या विषयी :
मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय येथील गुन्हे शाखेचे कामकाज पोलीस उप आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली आहे.
गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे मुख्य कर्तव्य हे गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यांचा तपास व चौकशी करणे आहे.
गुन्हे शाखेमध्ये खालील शाखा/कक्ष/पथक यांचा समावेश आहे :
गुन्हे प्रकटीकरण युनिट 1, 2, 3 आणि मध्यवर्ती गुन्हे युनिट
प्रत्येक परिमंडळाकरीता तीन युनिट तसेच मध्यवर्ती गुन्हे तपास युनिट कार्यरत आहेत.
हे युनिट मुख्यत्वे खून, खूनाचा प्रयत्न, अग्निशस्त्राचा उपयोग करुन घडणारे गुन्हे, अंमली पदार्थ विरोधी कारवाया, संघटीत वाहन चोरी, अंडरवर्ल्ड संघटना, संघटीत गुन्हे, दरोडखोरांची टोळीवर कारवाई, यासारख्या गंभीर गुन्ह्यांच तपास करतात, अश्या गुन्ह्यांची व्याप्ती व जटीलता अधिक असल्यामुळे विशेष प्राविण्य असलेले समर्पित अधिकारी व अंमलदार यांची निवड केलेली असते.
वरील युनिट व्यतिरीक्त खालील शाखा/कक्ष/पथक देखील गुन्हे शाखा अंतर्गत कार्यरत आहेत.
मानव तस्करी विरोधी युनिट
- हे युनिट संघठीत वेश्याव्यवसाय, हॉटेल्स, गेस्ट हाउस, ब्युटी पार्लर, डान्स बार, स्पा आणि वेश्यागृहांमध्ये चालणा-या रॅकेटवर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 अन्वये कारवाई करतात. मुख्यत्वे लहान मुली आणि जबरीने वेश्याव्यवसायात ढकलल्या जाणा-या पिडीतांची सुटका केली जाते.
त्याचप्रमाणे कारखाने, गोदामे आणि इतर आस्थापनांमध्ये अवैध बालमजुरी होत असल्यास त्या ठिकाणी छापा कारवाई करुन बालमजुरांची सुटका केली जाते आणि त्यांचे पुनर्वसन केले जाते, सद्यस्थितीत भाईंदर व नालासोपारा या ठिकाणी मानव तस्करी विरोधी युनिट कार्यरत आहेत.
अंमली पदार्थ विरोधी युनिट
हे युनिट अंमली औषधिद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम 1985 ज्यामध्ये हेराईन, गांजा, मॉर्फीन, चरस, हॅशिश तेल, कोकेन, मेफेड्रोन, एल एस डी, केटामिन, अॅंफेटामिन आणि इतर पदार्थांचे उत्पादन, वाहतूक, ताबा किंवा विक्री करणा-या लोकांवर प्रचलित कायद्यांतर्गत कारवाई करते. तसेच शाळा व महाविद्यालय यामध्ये अंमली पदार्थांचे होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृती अभियान राबवित असते.
दहशतवाद विरोधी शाखा
ही शाखा दहशतवादी कृत्ये रोखण्यासाठी आणि पोलीस आयुक्तालयात गुप्तपणे कार्यरत असलेल्या राष्ट्रविरोधी घटकांची गोपनीय माहिती संकलित करण्यासाठी तसेच दहशतवादाकडे वाटचाल करणारे तरुण, तरुणी यांना परावृत्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले आहे.
खंडणी विरोधी पथक
पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रात गंभीर खंडणी बाबतच्या गुन्ह्यांचा सखोल तपास होउन खंडणी प्रकरणातील सर्व गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा यासाठी स्वतंत्र खंडणी विरोधी पथक कार्यान्वीत करण्यात आलेले आहे.
भरोसा सेल
महिला सल्ला, कायदेशीर सल्ला आणि घरगुती हिंसाचार व अत्याचार ग्रस्तांना, वरिष्ठ नागरिक यांना सर्वतोपरी सहाय्य पुरविण्यासाठी भरोसा सेलची स्थापना करण्यात आली आहे. भरोसा सेल समुपदेशन, कायदेशीर सेवा आणि मानसोपचार सेवा पुरविते. भरोसा सेल सकारात्मक परिणाम साधण्याचे कार्य करतात व महीलांच्या तक्रारींचे निवारण व वैवाहीक तक्रारींचे निवारण करतात. भरोसा सेल शाळा व महाविद्यालय या ठिकाणी चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श ओळखण्यासाठी बालकांमध्ये जागरुकता मोहीमांचे आयोजन करतात, सद्यःस्थितीत भरोसा सेल भाईंदर व नालासोपारा येथे कार्यरत आहेत.
Telephone number:-
Email ID:- crimeunit1.mb-vv@mahapolice.gov.in atc.mb-vv@mahapolice.gov.in pi.centralunit.mb-vv@mahapolice.gov.in api.ahtcbhyndr.mb-vv@mahapolice.gov.in pi.mob.mb-vv@mahapolice.gov.in crimeunitvasai.mb-vv@mahapolice.gov.in crimeunit3.mb-vv@mahapolice.gov.in anc.mb-vv@mahapolice.gov.in pi.ahtp.mb-vv@mahapolice.gov.in acp.crime.mb-vv@mahapolice.gov.in bharosacell.mb-vv@mahapolice.gov.in bharosacell.mb-vv@mahapolice.gov.in