Initiatives
सायबर क्राईम जागरुकतेसाठी Reel Compitition आयोजन केलेबाबत
सायबर फसवणूक व ऑनलाईन फसवणूक, सोशल मिडीयाव्दारे होणारे गुन्हे याबाबत इंस्टाग्राम रिलव्दारे जनजागृती निर्माण करण्याकरीता ऑनलाईन इंस्टाग्राम रिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे, सदरची स्पर्धा दिनांक 04 ऑक्टोंबर, 2023 ते दिनांक 30 नोव्हेंबर, 2023 आयोजित करण्यात आले होते
प्रशिक्षण- बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम -2015 कलम 107 अन्वये
मा. पोलीस आयुक्त यांचे आदेशान्वये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम -2015 कलम 107 अन्वये विशेष बाल पोलीस पथक प्रशिक्षण दिनांक 16/01/2025 ते दिनांक 17/01/2025 रोजी 09.00 ते 17.30 या वेळेमध्ये आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये व्याख्याते म्हणुन श्री. संतोष शिंदे (विधायक भारती बाल हक्क संस्थेचे संस्थापक ) यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षण हे संवाद हॉल येथे आयोजित केले होते. सदर प्रशिक्षणाकरीता सर्व पोलीस ठाणे चे पोलीस अधिकारी उपस्थित होते.