Special Units | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

विशेष शाखा


Officers Portfolio

विशेष शाखा 

            विशेष शाखा हि पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील राजकीय घडामोडी, जातीय तणाव, विविध संघटनांकडुन केली जाणारी आंदोलने व भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवु नये यासाठी आगाउ माहिती वरिष्ठ कार्यालयास एकत्रितपणे उपलब्ध करुन देणे तसेच वरिष्ठ कार्यालयाशी समन्वय राखणे तसेच सार्वजनिक शांतता व सुरक्षितता संदर्भातील गोष्टी हाताळणे राजकीय व विविध संघटना यांच्या घडामोडींची गुप्त माहिती प्राप्त करणारी तसेच सार्वजनीकदृष्टया महत्वाची गोपणीय माहिती गोळा करुन वरिष्ठ कार्यालयांना पुरविण्याचे कामकाज करणारी शाखा आहे.

राज्य गुप्तवार्ता विभाग व अपर पोलीस महासंचालक (का. व सु.), दुय्यम गुप्तहेर विभाग, पोलीस ठाणे प्रभारी व इतर शाखा यांच्याशी समन्वय साधुन शासनास अहवाल पाठविणे हे विशेष शाखेचे कर्तव्य आहे.

विशेष शाखेचे काम पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) यांच्या अधिपत्याखाली व मार्गदर्शनाने चालते.

विशेष शाखेतील कामकाज व कक्ष

1) परकीय नागरिक कक्ष -   पोलीस आयुक्ताल कार्यक्षेत्रात वास्तव्यास येणा-या परकिय नागरिकांसंबंधित कामकाज पहाणे.

2) राजकिय व संघटना कक्ष -   पोलीस ठाणेची भौगोलिक रचना, संवेदनशिल ठिकाणे, औदयोगीक क्षेत्र यांची माहीती अध्यावत करणे, राजकिय संघटणा व त्यांच्या कार्यकर्त्यांची माहीती अध्यावत करणे व वेळोवेळी अहवाल वरिष्ठांना पाठविणे

3) मनाई आदेश -  पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) यांच्या मार्फतीने विशेष शाखेकडुन खालील मनाई आदेश जारी केले जातात अ) भाडेकरु मनाई आदेश, ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 पोट कलम (1) व (3) अन्वये मनाई आदेश क) विशेष मनाई आदेश

4) संरक्षण कक्ष -   सरकारी, निमसरकारी, खाजगी संस्थेने मागणी केल्याप्रमाणे सशुल्क किंवा निशुल्क पोलीस बंदोबस्त देणेकामी संबंधित पोलीस ठाणे प्रभारी यांना कळवुन पोलीस बंदोबस्ताबाबत पाठपुरावा केला जातो.

5) आपत्कालीन साथीचे रोग तत्सम साथीचे आजार कक्ष -  पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील नागरिक, पोलीस अधिकारी व अंमलदार यांना साथरोगाची बाधा उपचार व लसीकरण बाबत माहिती संकलित करुन वरिष्ठांना सादर करणे

6) पारपत्र कक्ष -  मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्याक्षेत्रात वास्तव्यास असलेले भारतीय नागरिक यांनी नविन पारपत्र मिळणे करिता, नुतनिकरण करणे करिताचे अर्ज केल्यानंतर पोलीसांकडून अर्जदार यांचे nationality & criminality चेक करुन त्याप्रमाणे पडताळणी अहवाल ऑनलाईन भरले जाते. त्यानंतर सदरचा पडताळणी अहवाल इकडील कार्यालयामार्फत ऑनलाईन पारपात्र कार्यालयात पाठविण्यात येतो.

7) धार्मिक/सौहार्द व संभाव्य घटना कक्ष -  हिंदु मुस्लिम, हिंदु देव-देवस्थान, अनुसुचित जाती जमाती/अल्पसंख्यांक, याबाबतची माहीती संकलीत करणे, संबंधित दाखल गुन्हयांची, घटणांची माहिती संकलीत करणे व त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविणे

8) जनरल डयुटी कक्ष -  विशेष शाखेत असणारे सर्व अधिकारी अंमलदार यांना टेबल प्रमाणे कामकाज वाटप करणे

9) कायदा व सुव्यवस्था कक्ष -   कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने माहिती प्राप्त करुन योग्य बंदोबस्त नेमणे तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करणे

10) चारित्र्य पडताळणी कक्ष -शासकीय, खाजगी कार्यालयांकडून नोकरीस लागलेले उमेदवारांची / अर्जदार यांचे चारीत्र्य पडताळणी अहवालाची प्रकरणे प्राप्त झाल्यानंतर सदरचे प्रकरणे सबंधित पोलीस ठाण्यात पाठवून पोलीस ठाणेकडुन अर्जदार यांचे वास्तव्य कालावधी व त्यांचेवर दाखल गुन्हयांची माहिती तपासुन पडताळणी अहवाल प्राप्त करून अर्जदार यांचे कार्यालयांत चारीत्र्य पडताळणी अहवाल पाठविण्यात येतो.

11) सण-उत्सव कक्ष-विविध सण -उत्सवाचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी हद्दीत पोलीस ठाणेच्या मागणीप्रमाणे बंदोबस्त आराखडा तयार करुन वरिष्ठांच्या मान्यतेने बंदोबस्त वाटप करणे, विविध सण-उत्सवाचे अनुषंागने निर्धारण अहवाल, मागणी बदोबस्त, सुचना प्रसारीत करणे, अखेर अहवाल तयार करणे व वरिष्ठांना पाठविणे

12) पेपरकात्रण कक्ष -  मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाशी संबंधित कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने रोज विविध वर्तमान पत्रात येणा¬या महत्वाच्या बातम्यांचे कात्रण करुन वरिष्ठांना सादर करणे.

13) निवडणुक कक्ष - निवडणुक संदर्भात कामकाज करणे

14) आवक जावक (बारनिशी) -  वरिष्ठांकडुन आलेल्या पत्रांचे वाचन करुन त्याची आवक-जावक नोंदवहीमध्ये नोंद घेणे व प्रभारी पोलीस निरिक्षक, विशेष शाखा यांना अवालेकनाकरिता सादर करणे.

.                                                                 


Telephone number:- 9821211929


Email ID:- pi.sb.mb-vv@mahapolice.gov.in