Blogs | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

आर्थिक व्यवहार करताना




initiativesimg

    पैसा हा आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनातील जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी पाच वर्षांपूर्वीं‌ आपण पैशाचे व्यवहार रोख किंवा धनादेशाच्या द्वारे करत असु. परंतू २०१६ साली झालेल्या नोटबंदीनंतर अचानक भारतात डिजीटल व्यवहारांमध्ये वाढ झाली. ऑनलाईन पेमेंट सिस्टीम आल्यानंतर आपल्यातील बऱ्याच लोकांचे जीवन सोपे झाले आहे. बँकिंग व्यवहार सोपे, सुलभ व वेगवान झाले आहे. कागदविहीन डिजिटल बँकिंग (Paperless digital banking) उदाहरणार्थ क्रेडीट/डेबीट कार्ड, मोबाईल पेमेंट्स, बॅंक ट्रान्स्फर,ई वॉलेट्स , डायरेक्ट डिपॉझीट्स, एन ई एफ टी, आय एम पी एस, आरटीजीएस हे सर्व २४ तास आपणास उपलब्ध असतात. भारत आता कागदविहीन बँक (Paperless bank) व्यवहाराकडे जाण्याच्या तयारीत आहे. तरीही कागदी व्यवहार संपूर्णपणे बंद किंवा बाद होणे अजून तरी अशक्य वाटते. म्हणूनच आज आपण चेक बाऊंसींगच्या कलमातील विवीध तरतूदीं विषयी जाणून घेऊया. पारंपारिक व्यवहार करण्याच्या पद्धती म्हणजेच व्यवहार करताना पैसे देणे व दुसर्‍यांकडून पैसे घेणे. विना रोकड व्यवहार करण्याच्या पद्धती उदाहरणार्थ धनादेश (cheque), ड्राफ्ट draft इत्यादी देणे केव्हा घेणे. जवळजवळ सर्व व्यवहारांमध्ये धनादेशांचा उपयोग केला जातो जसे कर्जाची परतफेड, पगार भरणे, बिले, फी इत्यादी. धनादेशामध्ये (cheque) तारीख, शब्द, आकडेवारी आणि ज्या व्यक्तीला हा धनादेश (cheque) दिला जातो त्या व्यक्तीचे /विक्रेत्याचे/संस्थेचे नाव लिहिणे आवश्यक असते. ती व्यक्ती/विक्रेता/संस्था हा धनादेश त्याच्या बँकेत सादर करते आणि ही रक्कम त्वरित त्याच्या खात्यात जमा केली जाते. धनादेश (cheque) देणे ही पद्धत सर्वात सुरक्षित आणि सोयीस्कर मानली जाते व सर्वात मोठी रक्कम सुद्धा सुरक्षितरित्या दिली जाऊ शकते. हे धनादेशाचे (cheque) बुक आपल्याला बँक खातं उघडताना बँकेकडून दिले जाते. अनेक प्रकारचे धनादेश (cheque) आहेत. उदाहरणार्थ बेअरर चेक, क्रॉस चेक, स्टेल चेक, ऑर्डर चेक,सेल्फ चेक,पोस्ट डेटेड चेक व बॅंकर्स चेक. चेक क्रॉस केल्यास चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात रक्कम जाण्याची शक्यता कमी करते. धनादेश (cheque) देणारी व्यक्ती/विक्रेता/संस्था कोणत्याही क्षणी धनादेश (cheque) रक्कम देणे रोखू शकते जोपर्यंत दुसऱ्या बाजूची व्यक्ती/विक्रेता/संस्था बँकेत धनादेश (cheque) सादर करत नाही तोपर्यंत. जेव्हा बँक भरलेला धनादेश ( cheque) परत करते तेव्हा धनादेशाचा अनादर (cheque dishonor/cheque bounce) चेक बाऊन्स म्हणून ओळखला जातो. धनादेश बाऊन्स (cheque bounce) होताच बँक नेहमी पेमेंट (payment) न करण्याचं आवश्यक कारण व धनादेशाचा परत करण्याचा मेमो जारी करते (हे धनादेश बाऊन्स होण्याची पहिली घटना असू शकेल किंवा नसेलही).ज्या व्यक्तीने आपल्याला चेक दिला आहे, तो जर त्याच्या खात्यात आवश्यक असलेली रक्कम भरणार असेल, तर आपण तो धनादेश पुन्हा आपल्या बॅंकेत सादर करू शकतो. सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊन नंतर आर्थिक वाद वाढत आहेत. खोटे, फसवे, चुकीचे, धनादेश (cheque) व्यक्तीला/विक्रेत्याला/संस्थाला दिले व घेतले जाऊ शकतात आणि काही कारणास्तव बँक हे धनादेश (cheque) नाकारू शकते. बँकेने धनादेश (cheque) नाकारण्याची अनेक कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. अपुरा निधी- कोणताही धनादेश (cheque) लिहिलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे खात्यात असल्यास बँक रक्कम देणे रोखू शकते. म्हणूनच, धनादेश (cheque) देताना सावध रहा आणि सावधगिरी बाळगा आणि खात्यात योग्य रकम शिल्लक ठेवा. 2. धनादेशांवर उल्लेख केलेली तारीख- धनादेशांवर उल्लेख केलेली तारीख योग्य असावी. धनादेशावर असलेल्या तारखेपासून तीन महिन्याच्या आत बँकेत सादर करणे आवश्यक आहे. 3. स्वाक्षरी जुळत नसल्यास- स्वाक्षरी योग्य व अचूक करणे आवश्यक आहे. 4. संख्या आणि शब्दांमध्ये नमूद केलेल्या रकमेत फरक असल्यास - योग्य रक्कम संख्या आणि शब्द लिहिणे आवश्यक आहे. 5. तपशील अस्पष्ट, बरेच डाग किंवा खुणा धनादेशवर (cheque) असल्यास- धनादेशावरील (cheque) तपशील स्पष्ट स्वरूपात लिहिणे आवश्यक आहे. धनादेशावर (cheque) कोणत्याही प्रकारची दुरुस्ती नसावी, डाग किंवा खुणा नसाव्यात. एक ही Cheque bounce झाल्यास तुमच्या (CIBIL score) सिबिल स्कोअरवर वाईट परिणाम करू शकतो आणि आपण कर्जापासून वंचित राहू शकता. धनादेश बाऊन्स (cheque bounce) झाल्यास काय कराल? धनादेश बाऊन्स (cheque bounce/Cheque dishonor) झाल्यास हा फौजदारी गुन्हा होतो. ह्या गुन्ह्यात दोन वर्षाची शिक्षा होऊ शकते किंवा धनादेशाच्या दुप्पट दंडा भरावा लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षेस ती व्यक्ती पात्र ठरु शकते. धनादेश बाऊन्स (cheque bounce) झाल्यास सर्वात महत्वाची आणि उपयुक्त तरतूद म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कलम 138 (138 Negotiable Instruments Act). बँकेकडून “चेक रिटर्न मेमो” मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत कायदेशीर सूचना/नोटीस पाठवणं आवश्यक आहे. कायदेशीर नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीला धनादेशची रकम भरणे आवश्यक आहे. कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर ती व्यक्ती पैसे परत करण्यास अयशस्वी झाल्यास १३८ एन आय कलमा अंतर्गत गुन्हेगारी तक्रार दाखल करण्याचा अधिकार त्या संबंधित व्यक्तीला आहे. नोटीसची मुदत संपेपर्यंत एका महिन्याच्या आत दंडाधिकारी न्यायालयात संबंधित व्यक्तीने तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदवण्यापूर्वी तक्रारदाराकडे सर्व महत्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे, उदाहरणार्थ 1. बँकेकडून परत आलेल्या धनादेशाच्या प्रती. 2. छायाप्रती, मेमो, 3. कायदेशीर नोटिसची प्रत 4. कायदेशीर नोटिसची पोचपावती. एकदा तक्रारधारकांनी तक्रार दिल्यानंतर न्यायालय आरोपी व्यक्तीस समन्स बजावते. संपूर्ण खटला संपल्यानंतर आणि आरोपी दोषी आढळल्यास त्याला दंडाची शिक्षा होऊ शकते किंवा धनादेशाच्या दुप्पट रकम किंवा दोन वर्षांची कोठडी किंवा दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात. भेटवस्तू किंवा देणगी म्हणून देण्यात आलेल्या कोणतेही धनादेश (cheque) (बाऊन्स) झाल्यास एनआय कायद्याच्या कलम १३८ (१) अंतर्गत समाविष्ट केले जाऊ शकत नाही. डिजिटल व्हा, व चेक अनादर शुल्क टाळा. धनादेश (cheque bounce) शुल्क टाळण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे डिजिटल बँकिंग करणे. चेक देण्याऐवजी ऑनलाईन फंड ट्रान्सफर करणे निवडा, नेटबँकिंग किंवा मोबाइल बँकिंग वापरा. या वेबसाइटवरील सर्व माहिती चांगल्या हेतूने आणि केवळ सामान्य नागरीकांच्या माहितीसाठी प्रकाशित केली गेली आहे. लेखन- एड. श्रीमती.अलोका नाडकर्णी