Blogs | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

इच्छापत्र/मृत्युपत्र




initiativesimg

    प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये अनेक गोष्टी मिळविण्याचा ध्यास असतो. त्यामध्ये संपत्ती निर्माण करणे हेही एक लक्ष असतेच. किंवा बर्याच वेळेस व्यावसायीक यश मिळविण्याच्या ओघात आपोआपच संपत्ती निर्माण होत असते. या संपत्तीची तर आपण काळजी घेत असतोच. परंतू आपल्यानंतर आपल्या वारसांकडेही ही संपत्ती सुरळीतपणे हस्तांतरीत होणे गरजेचे असते. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्व गुंतवणूकी व मालमत्ता याची माहीती मुलांना नसली तरी आपल्या जोडीदारास तरी असायलाच हवी. परंतू बहुतेक वेळा ही माहीती आपल्या जोडीदाराला सांगितलीच जात नाही. त्यामुळे त्या व्यक्तीच्यापश्चात कौटुंबिक वाद व गुंते निर्माण होतात. व वारसदारांना कोर्टाचे खेटे घालायला लागतात. या गोष्टी टाळण्यासाठी सर्वप्रथम वित्तीय व्यवहार आपल्या पती/पत्नीला विश्वासात घेऊन करावेत. कमीत कमी ते आपल्या जोडीदाराला माहीत असणे गरजेचे आहे. व प्रत्येक गुंतवणूकीमध्ये आपल्या कुटूंबातील एखाद्या व्यक्तीचे नामनिर्देशन (nominee) असणे गरजेचे आहे. यामुळे त्या व्यक्तीच्या पश्चात संपत्तीचे हस्तांतरण सुरळीत पार पडेल. परंतू केवळ एखाद्या व्यक्तीच्या नावे नामनिर्देशन (nominee) असल्याने ती व्यक्ती त्या संपत्तीची कायदेशीर वारसदार ठरत नाही. तर संपत्तीची आपल्या पश्चात सुरळीतपणे वाटणी व व्यवस्थापन होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपले म्रुत्यूपत्र बनविणे गरजेचे आहे. म्हणुनच आजच्या लेखात आपण म्रुत्युपत्र बनविण्याच्या कायदेशीर प्रक्रीयेविषयी जाणून घेऊया. मृत्युपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याच्या पश्चात त्याच्या मालमत्तेचे/संपत्तीचे वाटप कसे करावे या संबंधित लिखित कायदेशीर दस्तावेज. सध्याच्या धकाधकीच्या युगात पालक व तरुण मुले यांच्यातील नातेसंबंध फारच व्यावहारिक व तणावपूर्ण बनत चालले आहेत, त्यामुळे तर आपल्या वयाच्या पन्नाशीच्या टप्प्यावर आपण मृत्युपत्र बनविणे फारच गरजेचे झाले आहे. आपल्या स्वकष्टार्जित संपत्तीचे वाटप आपल्या पश्चात कुणाला किती प्रमाणात करावे, कुणाला देऊ नये वा ती एखाद्या समाजसेवी संस्थेला दान करावी हा आपला कायदेशीर अधिकार आहे व तो आपल्याला या इच्छापत्राद्वारे स्पष्ट शब्दात बजावता येतो. यामुळे आपली संपत्ती चुकीच्या व्यक्तीच्या ताब्यात जाणे आपण टळू शकतो, व आपल्या पश्चात आपली मुले व वृध्द पालक यांना कुणावरही अवलंबून राहावे लागत नाही. आपल्या इच्छेनुसार संपत्ती/मालमत्तांचे वाटप तेही कमी खर्चात हे इच्छापत्र करते. व त्याचसोबत भविष्यात कौटुंबिक कलह टाळण्याचे अथवा कमी करण्याचे काम करते. तर इच्छापत्र बनविण्याचे अनेक फायदे आपल्या लक्षात आले असतीलच. आता पाहूया इच्छापत्र बनविताना कोणती खबरदारी आपण घ्यायला हवी. सर्वप्रथम भौतिक मालमत्ता (जमीन, इमारती, घरे, कारखाने, यंत्रसामग्री, कार्यालये, वाहने, दागिने, सोने, चांदी ई.) व आर्थिक मालमत्ता (शेअर्स, रोखे, बँकेतील ठेवी, कॉपी राइट्स, पेटंट, आरोग्य विमा पॉलिसी, म्युचुअल फंड्स ई.) यांची एक काळजीपूर्वक यादी बनवावी. त्या नंतर या मालमत्तांची वाटणी कुणाला किती प्रमाणात करायची याची एक यादी बनवा. याचबरोबर आपल्यावर असणाऱ्या सर्व कर्जांची (गृहकर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज, क्रेडीट कार्ड्स, त्या संबंधित सर्व कागदपत्रे ई.) एक यादी तयार. जरी या याद्या संकलित करणे वेळखाऊ व त्रासदायक असले तरीही भविष्यात होणारा त्रास टाळण्यासाठी फारच जरुरीचे आहे. सर्वात शेवटी या याद्यांमध्ये कोणती मालमत्ता, कर्ज अथवा व्यक्तीचे नाव लिहायचे राहिले नाही ना याची खात्री करून घ्या. नंतर एखाद्या अनुभवी व आपल्या विश्वासातील वकिलाकडून आपल्यास हवे तसे इच्छापत्र बनवून घ्या.एकद इच्छापत्र तयार झाले कि त्यावर त्यादिवसाची तारीख लिहा व दोन उपस्थित साक्षीदारांसमोर तुमची स्वाक्षरी करा. या साक्षीदारांच्या उपस्थितीत तुम्ही स्वाक्षरी केलीत याची सत्यता पडताळण्यासाठी त्यांना भविष्यात न्यायालयात बोलावले जाऊ शकते. हे साक्षीदार किंवा त्यांचे नातेवाईक या इच्छापत्रातील तरतुदीनुसार कोणत्याही प्रकारे आर्थिक अथवा वैयक्तिक लाभार्थी नसावेत. साक्षीदारांची संपूर्ण नावे व पत्ते या इच्छापत्रात निर्दिष्ट केले पाहिजेत. या साक्षीदारांना आपले इच्छापत्र वाचण्याची गरज नाही. मूळ इच्छापत्र व त्याच्या छायाप्रती (Xerox), करारनामे व इतर कायदेशीर कागदपत्रे सुरक्षितपणे व योग्य ठिकाणी एकत्रित ठेवा. आपल्या विश्वसनीय लोकांना या ठिकाणाची माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून जेव्हा गरज पडेल तेव्हा मूळ इच्छापत्र लगेचच सादर केले जाऊ शकते. याच प्रकारे आपण बक्षीसपत्रही बनवू शकतो. आपल्या मालमत्तेचे वाटप आपल्या हयातीतच या बक्षीसपत्रातील लाभार्थींना होते. व ते एकदा बनविले कि पुन्हा बदलता येत नाही. तर आपले इच्छापत्र आपण आपल्या हयातीत कितीही वेळा बदलू शकतो किंवा याला पुरवणी जोड शकतो व ते बदलणे सोपे आहे. मृत्युपत्रामध्ये मालमत्तेचे वाटप व्यक्तीच्या मृत्यूनंतर होते. व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत वारसाला कोणतीही मालमत्ता व कोणताही मालमत्तेचा अधिकार, इच्छापत्राचा मालक हयात असेपर्यंत प्राप्त होऊ शकत नाही. हा बक्षीसपत्र व इच्छापत्र यातील मुलभूत फरक आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण संपत्तीचे बक्षिसपत्र कधीही बनवू नये. व बक्षिसपत्र बनविल्यास त्यावर बाजारभावाने मुद्रांक शुल्क भरावे लागते. इच्छापत्राची (Will) नोंदणी कायद्याने आवश्यक नाही. पण इच्छापत्राची (Will) नोंदणी करण्याची नसल्यास, नोटराईज करून घ्यावी. पण इच्छापत्राची नोंदणी करणे उचित होईल किंवा नोटराईज तरी करून नक्कीच घ्यावी. नोंदणी केलेल्या मृत्युपत्रात सामान्यपणे नष्ट करणे, हरवणे किंवा चोरी करणे शक्य होत नाही. नोंदणीकृत इच्छापत्र त्या व्यक्तीने रद्द केल्यास त्यानंतर नवीन इच्छापत्र बनवून नोंदणी करणे आवश्यक असते. इच्छापत्राचा मालकाने आपल्या इच्छेनुसार एक विश्वस्थ (Executor) निवडावा हा विश्वस्थ (Executor) विश्वासू व खात्रीलायक असणे आवश्यक आहे. इच्छापत्राच्या मालकाच्या निधनानंतर विश्वस्थाने (Executor) प्रोबेटसाठी प्रोबेट कोर्टात अर्ज करावा. हा अर्ज इच्छापत्र मालकाच्या मृत्यूनंतर दोन वर्षाच्या आत करणे गरजेचे असते. ह्या अर्जाबरोबर मालकाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र (Death Certificate) जोडणे आवश्यक आहे. मृत्युपत्र मालकाच्या मृत्युनंतर हा विश्वस्थ (Executor) बिले भरणे, क्रेडिट कार्ड रद्द करणे, बँकेला सूचित करणे व इतर कामे पार पाडण्यास जबाबदार असतो. आपल्या आयुष्यात, काही प्रमुख घटना घडल्यास उदाहरणार्थ जन्म, मृत्यू, घटस्फोट इत्यादी किंवा मालमत्ता विकत घेतल्यास किंवा विकल्यास तुम्ही मृत्युपचा पुनर्विचार करून मृत्युपत्र बदलू शकता. मृत्युपत्र/इच्छापत्र (Will) करणे सोपे आहे. म्हणून उशीर करू नका. या वेबसाइटवरील सर्व माहिती चांगल्या हेतूने आणि केवळ सामान्य नागरीकांच्या माहितीसाठी प्रकाशित केली गेली आहे. अ‍ॅड. आलोका अ. नाडकर्णी