Blogs | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

इंटरनेटच्या जगात वावरतांना घ्यावयाची काळजी




initiativesimg

    विसाव्या शतकातून एकविसाव्या शतकात प्रवेश करताना जगात एक फार मोठी क्रांती झाली ती म्हणजे इंटरनेट क्रांती. हि क्रांती औद्योगिक क्रांतीपेक्षा कैकपटीने अवाढव्य होती. या क्रांतीने जगातील सर्वच व्यवहारात अमुलाग्र बदल घडवून आणले. जी कामे आपण पंचवीस वर्षांपूर्वी प्रत्यक्ष एखाद्या कार्यालयात जाऊन अथवा फोनच्या माध्यमातून करत होतो ती बहुतेक कामे एकविसाव्या शतकात प्रवेश करता करता डिजिटल माध्यमाद्वारे होत आहेत. म्हणजेच आपण सर्व डिजिटल जगात राहतो आणि हे डिजिटल जग प्रचंड वेगाने बदलत आहे. आज आपण सर्वजण या डिजिटल जगावर संपूर्णपणे अवलंबून आहोत. इंटरनेटचा वापर आपल्या सार्वजनिक आणि खाजगी आयुष्यात सर्वत्र आहे. इंटरनेटने आपल्या आयुष्यात अशा प्रकारे परिवर्तन केले आहे की ज्याची आपण कधी कल्पना देखील केली नव्हती. विशेषतः गेल्या एका वर्षात आपण तर रोज इंटरनेटचा वापर करत आहोत. घराबाहेर जाऊन आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी कामे करत होतो उदाहरणार्थ अन्न, वस्तू खरेदी करणे, बातम्या वाचणे, बँकिंग व्यवहार करणे चित्रपट बघणे इत्यादी ही सर्व कामे आज-काल आपण घरबसल्या इंटरनेटच्या (internet) माध्यमातून करत आहोत. इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. नवनवीन तंत्रज्ञान नवीन संधी निर्माण होत आहेत. परंतु आपण सर्व डिजिटल जगात गोपनीयतi आणि सुरक्षिततेबद्दल अत्यंत चिंतेत आहोत. आज आपण इंटरनेटच्या सुरक्षिततेबद्दल आणि भारतातील सायबर गुन्ह्यां विषयी कायदे जाणून घेणार आहोत. आपण ऑनलाईन असताना आपण जे काही इंटरनेटवर शोधतो, बघतो त्याची नोंद इंटरनेटच्या महाजालात डिजिटल स्वरुपात होत असते. आणि ह्या सर्व ऑनलाईन माहितीचा मागोवा घेण्यासाठी अनेक ट्रेकर्स (trackers) आपल्यावर हेरगिरी करत असतात. ही हेरगीरी आपण कोण आहोत, आपल्या आवडी निवडी काय आहेत, आपले हितसंबंध कोणाशी आहेत, याचे स्पष्ट चित्र ह्या वेबसाईट ट्रेकिंगच्या माध्यमातून होत असते. बर्‍याच वेळा ही माहिती जाहिरातीच्या उद्देशाने ट्रेक (track) केली जाते. तर इंटरनेटवर बर्‍याच ॲप्स, वेबसाइट अशा आहेत ज्यांची सेवा घेण्यासाठी आपली वैयक्तिक माहिती त्या ॲप्स, वेबसाइटना देणे आवश्यक असते. काही वेळेला मजेसाठी आपण आपली वैयक्तिक माहिती, दूरध्वनी क्रमांक, आपले लोकेशन्स, निवासी पत्ता, फोटोज, व्हिडीओ, बरीच व्यक्तिगत जीवनातील घटनांची माहिती आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांशी इंटरनेट व सोशल नेटवर्किंग द्वारा शेअर करत असतो आपण ही माहिती व डेटा केवळ आपल्या व्यक्तिगत वर्तुळा पुरती मर्यादित न राहता हा डेटा सोशल मीडियाच्या अकाउंट वर संग्रहित केला जातो आणि बऱ्याचदा आपल्या नकळत तो कायमचा तिथेच राहतो व काही वेळेला चुकीच्या कारणांसाठी वापरलाही जाऊ शकतो. सोशल मीडिया ॲप्स, गुगल नकाशे आणि इतर ॲप्स देखील आपल्या लोकेशन्स विषयी आपल्या कडून जाणून घेतात आणि आपण कुठे आहोत याबद्दल जगाला आपली माहिती देतात ते काही वेळा धोकादायक असू शकते. आपण हे धोके पूर्णपणे थांबवू शकत नाही परंतु काही काळजी नक्कीच घेऊ शकतो. 1. गुगल प्लेस्टोअर (Google playstore) / ॲपल स्टोअर (Apple store) वरून कोणताही ॲप्स (Apps) डाउनलोड करण्यापूर्वी त्या ॲप्सचे विकसक (developer), परीक्षण (reviews), रेटिंग (rating) इतर वापरकर्त्यांनी दिलेली माहिती तपशील तपासा. इतर कोणत्याही स्टोअरवरून ॲप्स डाउनलोड करू नका. 2. मोबाइल आणि संगणकसाठी प्रभावी आणि विश्वासार्ह अँटीव्हायरस (Antivirus) वापरा. 3. आपली वैयक्तिक माहिती किंवा संकेतशब्द (passwords) सार्वजनिक करू नका. 4. संपर्क/संदेशiचा सर्वात सुरक्षित मार्ग असलेला व्हीपीएन (VPN) वापरा. 5. सशक्त संकेतशब्द वापरा: अक्षरे, विरामचिन्हे आणि संख्या यांचे संयोजन करा. 6. जन्माच्या तारखा, दूरध्वनी क्रमांक किंवा आपल्याबद्दलच्या सार्वजनिक माहितीवरुन अंदाज लावता येतील असे शब्द वापरू नका. 7. आपल्या संगणकाचा बॅक अप घ्या. 8. वापरात नसताना संगणक आणि ब्लूटूथ बंद करा. बंद केल्याने हॅकरने आपल्या नेटवर्कद्वारे स्थापित केलेले कनेक्शन तोडले जाते आणि कोणत्याही संभाव्य गैरवापरास अडथळा आणते. 9. आपली सिस्टम नियमितपणे स्कॅन (scan) करा किंवा ऑटो स्कॅनवर ठेवा. 10. आपली संमती देण्यापूर्वी गोपनीयता धोरणे वाचा. 11. असुरक्षित सार्वजनिक वाय-फाय (Wi Fi) वापरू नका. 12. आपला ब्राउझिंग इतिहास (browsing history ) नियमित खोडून टाका. 13. वेबसाइट पत्ता हाताने टाइप करा, थेट दुव्यावर क्लिक (website link) करू नका. माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० ("आयटी कायदा") आणि भारतीय दंड संहिता, 1860 ("आयपीसी") हे भारतातील सायबर गुन्ह्याशी संबंधित कायदे आहेत. भारतातील सायबर गुन्हे कायद्यांतर्गत दंडनीय गुन्हे खालीलप्रमाणे आहेतः 1. सायबर दहशतवाद- जो कोणी, भारताचे ऐक्य, अखंडता, सुरक्षा किंवा सार्वभौमत्व धोक्यात आणण्याच्या उद्देशाने किंवा लोकांमध्ये दहशत निर्माण करेल, संगणक हॅक करेल, अधिकृत व्यक्तीस प्रवेश नाकरेल किंवा कोणताही संगणक दूषित करेल, किंवा ते कारणीभूत असेल. गंभीर माहितीच्या पायाभूत सुविधांवर परिणाम करेल, ती व्यक्ती सायबर दहशतवादी कृत्यांसाठी दोषी असेल. जो कोणी जाणूनबुजून किंवा हेतुपुरस्सर संगणकीय अधिकृततेशिवाय प्रतिबंधित माहिती, डेटा किंवा संगणक डेटाबेसमध्ये प्रवेश करेल, अखंडता, राज्याची सुरक्षा, परदेशी राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता किंवा नैतिकता किंवा कोर्टाचा अवमान, बदनामी किंवा एखाद्या गुन्ह्यास भडकवणे किंवा कोणत्याही परदेशी देश, गटाच्या फायद्यासाठी व्यक्तींचा किंवा अन्यथा, 'सायबर दहशतवाद' साठीही दोषी आहे. यासाठी त्या व्यक्तीस जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. 2. हॅकिंग, व्हायरस हल्ला- जो कोणी सरकार किंवा कंपनीच्या डेटामध्ये प्रवेश करत वेबसाइट किंवा संगणक नेटवर्क बंद करणे किंवा त्याचा गैरवापर करणे. संगणक नेटवर्क आणि ऑनलाइन डेटा हॅक करणे आणि संगणक नेटवर्कद्वारे व्हायरस पसरवणे, हानी पोहोचवणे, नेटवर्क, प्रोग्राम, प्रणालीमध्ये व्यत्यय आणणे किंवा एखाद्या अधिकृत संगणकास नेटवर्कमध्ये प्रवेश नाकारेल, संगणकाची माहिती नष्ट करेल इ. यासाठी त्या व्यक्तीस तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते किंवा दोन लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही दंड होऊ शकतात. तुमचा संगणक सुरक्षित करा. तुमची ऑपरेटिंग सिस्टम अद्ययावत (upto date) ठेवा: वेळोवेळी अद्यावत झालेली नियमावली (system updates) स्थापित (install) करा. अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर (Antivirus software) वापरा. 3. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रकाशित किंवा प्रसारित करणे- जो कोणी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रकाशित किंवा प्रसारित करेल, कोणत्याही स्त्रीसोबत गैरवर्तणूक किंवा विनयभंग करेल (शब्द उच्चारण, आवाज, हावभाव किंवा वस्तू दर्शविते), महिलेच्या खाजगी माहितीचा गैरवापर करेल, यासाठी त्या व्यक्तीस पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. दुसर्‍यावेळी किंवा त्यानंतरची अटक झाल्यास यासाठी त्या व्यक्तीस दहा वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते किंवा दोन लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दंड व शिक्षा दोन्हीही होऊ शकतात. गैरवर्तनाची तक्रार त्वरित नोंदवा. कोणत्याही वापरकर्त्यास जर एखादा व्हिडीओ वा साहित्य यामध्ये अपमानास्पद, अयोग्य किंवा वापरण्याच्या अटींचे उल्लंघन करणारे प्रोफाइल किंवा फोटो आढळल्यास तुम्ही जरूर तक्रार नोंदवा. अशा तक्रारींची दखल घेऊन त्वरित कारवाई केली जाते. 4. फसवणूक- जो कोणी हेतुपुरस्सर फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट किंवा अप्रामाणिकपणे खोटे कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी, शिक्का, संकेतशब्द, ओळख चोरी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीची विशिष्ट ओळख वापरुन फसवणूक करेल यासाठी त्या व्यक्तीस तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. स्पॅमकडे (spam) दुर्लक्ष करा. अज्ञात व्यक्तीचे ईमेल/संदेशांपासून (emails) सावध रहा. 5. आर्थिक फसवणूक किंवा कार्ड पेमेंट डेटाची (card payment data) चोरी- तथाकथित परदेशी संस्था/व्यक्ती/प्रतिनिधी म्हणून परदेशी चलन व्यवहारात स्वस्त चलन देण्यासंबंधीच्या ऑफर / लॉटरी (lotteries) जिंकणे / पैसे पाठविणे ई. आमिषांवर विश्वास ठेवू नका. सायबर गुन्हे यासंबंधी तक्रार तुम्ही कशी कराल? तक्रार तीन प्रकारे केली जाऊ शकते. 1. तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता. https://mumbaipolice.gov.in/OnlineComplaints?ps_id=0 www.cybercrime.gov.in (भारत सरकारने ऑनलाइन सायबर-गुन्हे पोर्टल) Call Helpline Number - 155260 09:00 AM To 06:00 PM 2. तुम्ही लेखी तक्रार तुमच्या जवळच्या सायबर सेलला जाऊन करू शकता 3. तुम्ही एफआयआर नोंदवू शकता. (एफ आय आर कशी नोंदवाल आणि एफ आय आर पोलिसांनी नाकारल्यास काय कराल या विषयी मागील लेखात लिहिले आहे.) सायबर गुन्ह्याचा तपास इन्स्पेक्टर किंवा वरील रँक अधिकायांमार्फत केला जातो, तो तक्रार नोंदवू शकतो व त्यावर तपास करण्याचा अधिकार त्याला आहे. दुसर्‍या गुन्ह्याप्रमाणेच सायबर गुन्ह्याचा तपास करू शकतो. सायबर गुन्ह्याचा तपास करताना तो संबंधित अधिकारी तपास करण्यासाठी काही सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करू शकतो. कोणत्याही व्यक्तीचा संशय आल्यास त्या व्यक्तीचा शोध घेऊ शकतो आणि वॉरंटशिवाय अटक करू शकतो. वरील गुन्ह्यासाठी अटक केलेल्या व्यक्तीस या प्रकरणात न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर 24 तासाच्या आत हजर करणे क्रमपात्र आहे. भारतीय दंड संहिता कायद्याची कलमे ज्या व्यक्तीने गुन्हा केला आहे तो भारतात कोणत्याही जागी राहत असेल किंवा भारताबाहेर रहात असेल तरीही त्याने तो गुन्हा भारतात मूळ असलेल्या संगणकावर केला असल्यास अशा सर्व व्यक्तींना हि कलमे लागु होतात. बहुतके गुन्हे हे दखलपात्र आहेत. व खोडसाळपणा आणि बनावट छायाचित्रे व कागदपत्रे बनविणे हे अदखलपात्र गुन्हे आहेत. काही गुन्हे हे जामीनपात्र व सामोपचाराने मिटविण्याजोगे असतात. जर एखाद्या कंपनीने कोणताही सायबर गुन्हा केला असल्यास , प्रत्येकजण जो गुन्ह्याच्या वेळी हजर होता व त्या व्यवसायाचे संचालन करण्यासाठी जबाबदार असणारी व्यक्ती या सर्व व्यक्ती त्या गुन्ह्यासाठी जबाबदार असतील. आज आपण सर्वच तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून आहोत. जगाशी कनेक्ट होण्याचा सर्वात वेगवान मार्ग इंटरनेट आहे. आपण प्रत्येकजण योग्य ते सुरक्षेचे नियम पाळून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपले व्यवहार सुरळीत पार पाडूया. या वेबसाइटवरील सर्व माहिती चांगल्या हेतूने आणि केवळ सामान्य नागरीकांच्या माहितीसाठी प्रकाशित केली गेली आहे. अ‍ॅड. आलोका अ नाडकर्णी