Blogs | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

कागदपत्रांची नोंदणी आवश्यक का?




initiativesimg

    आपण सर्व आपल्या दैनंदिन जीवनात बरीच महत्वाची कागदपत्रे हाताळतो, उदाहरणार्थ मालमत्ता, इच्छापत्रे, विमा, कर्ज, व्यiवसाईक करार इ. काही कागदपत्रांची नोंदणी करणे अनिवार्य आहे तर काही कागदपत्रांची नोंदणी न करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे.आपण कोणताही व्यवहार करताना त्याची कागदपत्र बनविणे फार गरजेचे आहे. व काही व्यवहारात कायद्याने त्याची नोंदणी करणे बंधनकारक आहे. कायदेशी बाबींची पूर्तता करणे बर्याच वेळा त्रासदायक असू शकते.परंतु भविष्यातील त्रास टाळण्यासाठी हे करणे आवश्यक आहे. आज मी कागदपत्रांच्या नोंदणीबद्दल लिहित आहे. कोणत्या कागदपत्रांची नोंदणी करणे आवश्यक आहे, कोणत्या कागदपत्रांची नोंदणी करणे आवश्यक नाही,कागदपत्रांची नोंदणी कशी करiवी आणि कागदपत्रे का नोंदवावीत इ. सोप्या शब्दात नोंदणी म्हणजे अधिकृत यादीत नाव किंवा माहिती नोंदविण्याची प्रक्रिया. अधिकृत किंवा मान्यता प्राप्त अधिकारयाकडे (नोंदणी अधिकारी) कागदपत्र नोंदवून आणि मूळ कागदपत्रांच्या प्रती जतन करून नोंदणी केली जाते. नोंदणी प्रक्रियेमध्ये दस्तऐवजाची एक प्रत एका क्रमांकासह सरकारी डेटाबेसमध्ये जमा केली जाते, ती कागदपत्रे दोन पक्षांमधील व्यवहाराचा एक मजबूत पुरावा असतो. कागदपत्रांची नोंदणी का महत्त्वाची आहेत? • कागदपत्रांची नोंदणी केल्यास व्यवहारामध्ये पारदर्शकता येईल. • कागदपत्र नोंदणीकृत असल्यास, मालमत्तेसंदर्भात कोणतीही अडचण किंवा चालू असलेले खटले शोधणे सोपे जाते. • नोंदणीकृत दस्तऐवज हा एक सबळ पुरावा आहे आणि तो न्यायालयात पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. • कागदपत्रांची नोंदणी केल्यास व्यवहारामध्ये होणारी फसवणूक टाळण्यास मदत होते. विक्री किंवा भेटी, दान ई. कामे, मालमत्तेशी संबंधित (जमीन, इमारती आणि यात मालमत्तांशी संबंधित कोणतiही अधिकार समाविष्ट आहे), नोंदणीकृत असणे आवश्यक आहे, अन्यथा केले नाही तर हे हस्तांतरण कायद्याने अवैध ठरेल. आपण सर्वसाधारण मुखत्यार पत्राद्वारे (Power of attorney) मालमत्ता हस्तांतरित करू शकत नाही. मालमत्ता केवळ कन्व्हेयन्स डीडद्वारे हस्तांतरित केली जाऊ शकते. पारदर्शकतेसाठी आपली मालमत्ता नोंदणी करणे नेहमीच आवश्यक आहे. नोंदणीकृत कागदपत्रे, मालमत्ता हस्तांतरित केली गेली आहे की नाही केली गेली आहे हे सिद्ध करतात. आपण संपत्तीची कागदपत्रे हरविल्यास उपनिबंधक कार्यालयात मुखत्यार पत्राची (Power of attorney) सत्य प्रत मिळवू शकतो. मुखत्यारपत्र (Power of attorney) रद्द केले गेले तर तसे नमूद केलेले कागदपत्रदेखील नोंदविले जाणे आवश्यक आहे जेणेकरून नंतरच्या टप्प्यावर त्याचा गैरवापर होऊ नये.कायद्यानुसार जेथे कागदपत्रांची नोंदणी अनिवार्य आहे तेथे कागदपत्रांच्या नोंदणीशिवाय कोणत्याही व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. व्यवसायाच्या करारामध्ये कागदपत्रांची नोंद करणे योग्य असेल कारण यामुळे व्यवसायाच्या व्यवहारास अधिक पारदर्शकता येते आणि काही वाद उद्भवल्यास कागदपत्रे न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येतात. अशी काही कागदपत्रे आहेत ज्यांच्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे आणि काही कागदपत्रे ज्यात एकतर नोंदणीकृत किंवा नोटरी केली जाऊ शकते जसे की मुखत्यारपत्र (Power of attorney) ज्या मध्ये मालमत्ता विक्री नसेल, इच्छापत्र, भाडे करार आणि परवाना करार (leave and licence) इत्यादी. कोणती कागदपत्रे नोंदणी करणे अनिवार्य आहे ते आता पाहूया: १. स्थावर मालमत्ता भेट देणे - कोणतीही स्थावर मालमत्ता आपण स्वेच्छेने कोणत्याही पैशाच्या व्यवहाराशिवाय भेट देऊ इच्छित असल्यास. २. शंभर रुपयांहून अधिक किंमतीची स्थावर मालमत्ते संबंधित कोणतीही कागदपत्रे. ३.स्थावर मालमत्तेचे लीज- वार्षिक भाडे प्राप्त असणार्‍या कोणत्याही स्थावर मालमत्तेच्या लीजची कागदपत्रे, वार्षिक आधारावर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ४.कराराची कागदपत्रे- कोणत्याही स्थावर मालमत्तेची कराराशी संबंधित कागदपत्रे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ५. कोर्टाचा कोणताही हुकूम किंवा आदेश- जेव्हा असे हुकूम किंवा आदेश शंभर रुपयांहून अधिक असल्यास वर्तमान किंवा भविष्यात कोणतेही हक्क, title मध्ये नाव असेल किंवा तो लाभार्थी असेल तर कागदपत्रे नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. ६. विक्री करार, करारनामा, मालमत्तेचे हस्तांतरण अधिकृत करणारे मुखत्यारपत्र (Power of attorney) यांचेसाठी कागदपत्रे नोंदणी अनिवार्य आहे. वरील कागदपत्रांव्यतिरिक्त काही कागदपत्रे नोंदवायची की नाही याचा पर्याय आपणiस उपलब्ध आहे. ज्या कागदपत्रांची नोंदणी करणे अनिवार्य नाही ते म्हणजे दत्तक घेणे, डिबेंचर/ हस्तांतरण डिबेंचर, मुखत्यारपत्र (Power of attorney) मध्ये विक्री करण्याचा करार अंतर्भूत असेल, तारण करार, विक्रीचे प्रमाणपत्र, वचनपत्र इ. जंगम मालमत्ता, अधिकारपत्र, जंगम मालमत्तेसंदर्भात मुखत्यारपत्र (Power of attorney), इच्छापत्र (तूम्ही माझ इच्छापत्र हा लेख वाचू शकता) संबंधित कागदपत्रे नोंदवण्याची गरज नाही. तथापि अशा कागदपत्रांची नोंदणी करणे नेहमीच चांगले.मालमत्तेच्या हस्तांतरणाला पाठिंबा देणारी कागदपत्रे नोंदणीकृत नसल्यामुळे अनेकदा विविध न्यायालयांनी मालमत्तेचे हस्तांतरण अवैध ठरविले आहे. तुमचे नोंदणीकृत दस्तऐवज जरी नष्ट झाल्यास किंवा गमाल्यास, तूम्ही हस्तांतरण किंवा विक्री सिद्ध करू शकता. कागदपत्रांची नोंदणी प्रक्रिया ज्या (मालमत्तेची) कागदपत्रे नोंदणी करावयiची आहेत ती तूम्ही सब-रजिस्ट्रार कार्यालयात जमा करावयाची असतात ज्यांच्या (हद्दीत मालमत्ता). कागदपत्रांच्या नोंदणीसाठी विक्रेता व खरेदीदारास अधिकृत स्वाक्षर्‍या असलेल्या दोन साक्षीदारांसह हजर राहावे लागेल. स्वाक्षरी करणार्‍यांनी त्यांची ओळख पटविली पाहिजे. या हेतूने स्वीकारल्या गेलेल्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड आणि पॅनकार्ड, ओळखीचा पुरावा समाविष्ट आहे. येथे लक्षात घ्या की एकूण प्रक्रियेत साक्षीदार बरेच महत्त्वपूर्ण आहेत. याव्यतिरिक्त, प्रक्रियेदरम्यान त्यांची बायोमेट्रिक ओळख देखील स्कॅन केली जाईल. जर कंपनी कराराची बाजू घेत असेल तर, कंपनीचे प्रतिनिधीत्व करणार्‍या व्यक्तीकडे कंपनीची बोर्डाच्या ठरावाची प्रत आणि नोंदणी करण्याचे अधिकार देऊन हे अधिकारपत्र सोबत असले पाहिजेत. मूळ कागदपत्रे आणि मुद्रांक शुल्क भरल्याचा पुरावा यासह आपल्याला मालमत्ता कार्ड सब-रजिस्ट्रारकडे सादर करण्याची आवश्यकता आहे. कागदपत्रांची नोंदणी करण्यापूर्वी, उपनिबंधक मुद्रांक शुल्क रेडी रेकनरनुसार, मालमत्तेसाठी पुरेसे मुद्रांक शुल्क भरले गेले आहे की नाही याची पडताळणी करावी.मुद्रांक शुल्कामध्ये कोणतीही कमतरता असल्यास निबंधक कागदपत्रांची नोंदणी करण्यास नकार देतील. एखाद्या मालमत्तेवर कायदेशीर मालकी मिळवण्याकरता तुम्ही सरकारला दिलेला मुद्रांक शुल्क हा कर आहे. तर नोंदणी शुल्क ही कायदेशीर सरकारी नोंद होण्यासाठी फी आहे. मुद्रांक शुल्क हे राज्य दरवर्षी बदलत असते. बर्‍याच राज्यांत महिलांना स्टॅम्प ड्युटी भरण्यावर सूट देण्यात येते. यावर्षी महाराष्ट्र शासनाने महिलासाठी 1% मुद्रांक शुल्काची घोषणा केली.ज्या कागदपत्रांची अनिवार्यपणे नोंदणी करावी लागेल त्यांना आवश्यक फीसह, अंमलबजावणीच्या तारखेपासून चार महिन्यांत सादर करावी लागेल. मुदत संपल्यास, पुढील चार महिन्यांत आपण उशीर केल्यास कन्डोनेशनसाठी सब-रजिस्ट्रारकडे अर्ज करू शकता आणि दंड भरल्यास, रजिस्ट्रार सहमती देऊ शकतात. मालमत्तेच्या कागदपत्रांची नोंदणी करण्यात अयशस्वी झाल्यास आपल्या मालमत्तेलi मोठा धोका होऊ शकतो. मालमत्तi नोंदणीकृत असणे आवश्यक आहे परंतु नोंदणीकृत नसलेले कोणतेही दस्तऐवज कोणत्याही न्यायालयात पुरावे म्हणून दाखल करता येणार नाहीत. येथे नोंद घेणे उचित आहे की विशिष्ट मालमत्तेचा मालक म्हणून आपल्या नावाचा उल्लेख सरकारी नोंदीमध्ये केल्याशिवाय मालकी सिद्ध करणे शक्य होणार नाही. जर सरकारने ही संपत्ती कोणत्याही क्षणी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी अधिग्रहित केली तर मालक अशा परिस्थितीत जमीन / मालमत्ताधारकांना दिल्या जाणार्या नुकसान भरपाईचा दावा करु शकत नाही. बरेचदा स्थावर मालमात्तेची नोंदणी करण्या ऐवजी नोटरिचा पर्याय वापरला जातो. परंतु अशा नोंदणीला कायदेशीर मान्यता नाही आहे. त्यमुळे आपण स्थावर मालमत्तेचे व्यवहार करताना त्याची नोंदणी करण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. तर आता तुम्हाला कागदपत्रे नोंदणी करण्याचे फायदे व महत्व याविषयी माहिती या लेखातून मिळाली असेलच. या वेबसाइटवरील सर्व माहिती चांगल्या हेतूने आणि केवळ सामान्य नागरीकांच्या माहितीसाठी प्रकाशित केली गेली आहे. अ‍ॅड. आलोका अ नाडकर्णी