Blogs | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

कायद्याच बोला --माफीचा साक्षीदार




initiativesimg

    सहसा शांत, अज्ञात आणि दृष्टिआड ठिकाणी गुन्हे केले जातात. जिथे गुन्हा घडताना पहाण्यासाठी गुन्हेगारांशीवाय कोणतीही दुसरी व्यक्ती न्यायालयात साक्ष देण्यासाठी घटनास्थळी उपस्थित नसते. न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावा आणि साक्षीदारांची गरज असते. ज्या गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी कोणताही स्वतंत्र पुरावा आणि साक्षीदार उपलब्ध नसतो, अशा वेळेस माफीचा साक्षीदार मदतीस येतो. गुन्हे घडल्यानंतर पोलीस काही संशयित गुन्हेगारास पकडतात आणि चौकशी सुरू करतात. पण पुरेसा सबळ पुरावा व साक्ष नसल्यामुळे काहीवेळेस गुन्हेगाराना शिक्षा होत नाही व न्यायालयात पुराव्या अभावी गुन्हेगारास सोडून दिले जाते. त्यावेळेस माफीचा साक्षीदार झालेला गुन्हेगार मदतीस येतो. भारतीय दंड विधान कलमा मध्ये माफीच्या साक्षीदाराची व्याख्या करण्यात आलेली नाही. माफीचा साक्षीदार म्हणजे अशी व्यक्ती जी गुन्हा करते, गुन्हा होण्यास प्रवृत्त करते, गुन्हेगाराला गुन्ह्यांत मदत करते किंवा चिथावणी देते, गुन्हेगाराला संरक्षण देते किंवा त्यांना गुन्ह्याच्या स्थानापासून पळून जाण्यास मदत करते. माफीचा साक्षीदार म्हणजे जो व्यक्ती गुन्ह्याचा साक्षीदार आहे, बेकायदेशीर कृतीशी किंवा गुन्ह्याशी जोडलेला आहे, त्याचा गुन्ह्यामध्ये सक्रिय किंवा असक्रिय सहभाग आहे आणि त्या व्यक्तीने या गुन्ह्यात त्याच्या सक्रिय किंवा असक्रिय सहभागाची कबुली दिली आहे. या व्यक्तीस गुन्ह्या विषयी सर्व माहिती असते अशI व्यक्तीला अटक झालेली असते आणि त्या गुन्ह्यात ही व्यक्ती कमीत कमी दोषी असते. अशा गुन्हेगाराला माफीचा साक्षीदार केला जाऊ शकतो. गुन्हेगारास माफीचा साक्षीदार करणे ह्याला कायद्याची परवानगी आहे. एका गुन्हेगाराला इतर गुन्हेगारांच्या विरुद्ध साक्ष देण्याची परवानगी आहे. माफीच्या साक्षीदाराच्या आधारे बऱ्याच वेळा इतर गुन्हेगार ज्यांच्या गुन्ह्यांबद्दल पुरेसा पुरावा किंवा साक्षीदार मिळणे अशक्य आहे, त्यांना शिक्षा करण्यास मदत होते. ज्या गुन्हेगारांवर जास्त व भयंकर गुन्ह्यांची नोंद आहे त्याला माफीचा साक्षीदार केला जाऊ शकत नाही. पोलिस चौकशीत किंवा न्यायालयात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली व स्वत: त्या आरोपiबरोबर असणाऱ्या इतर गुन्हेगारांची नावे व गुन्हा कसा कधी कुठे घडवला याची तपशीलवार माहिती दिली तर तो आरोपी माफीचा साक्षीदार होऊ शकतो. आणि अशा रीतीने फिर्यादीचा सक्षम साक्षीदार होऊ शकतो. माफी कधी व कोण देऊ शकते: मुख्य न्यायदंडाधिकारी, सत्र न्यायालयाचे न्यायाधीश, ऊच्च/सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आरोपीस माफीचा साक्षीदार करण्याची परवानगी देऊ शकतात. ही परवानगी केवळ ज्या गुन्ह्यास सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा असलेल्या सर्व प्रकरणात दिली जाऊ शकते (हे गुन्हे आर्थिक स्वरूपाचे नसावेत). आरोपीस माफी देण्याचे कारण न्यायाधीशाने आणि सरकारी वकीलाने आरोपीस सांगणे व न्यायाधीशाने ह्याची नोंद घेणे आवश्यक आहे. आरोपीला का माफ करण्यात येत आहे व सजा कोणत्या मर्यादेपर्यंत कमी किंवा माफ केली जाऊ शकते, हे स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे आहे. माफीचा साक्षीदार हा एक कलंकित आरोपी असल्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक व सावधरीत्या छाननी करणे आवश्यक आहे. जोपर्यंत माफीच्या साक्षीदारIची साक्ष (Statement) इतर पुराव्यांशी जुळत नाही तोपर्यंत ह्या माफीच्या साक्षीदारIवर न्यायालयाला विश्वास ठेवणे कठीण जाते व त्या माफीच्या साक्षीदारIची साक्ष नाकारली जाऊ शकते. माफीच्या साक्षीदारावर सहसा विश्वास ठेवणे धोकादायक असू शकते. आणि जेव्हा हा खटला अपील मध्ये जातो तेव्हा, खटल्यात त्रुटी असल्यास न्यायालय हा निर्णय रद्द करू शकते. काही वेळा हा माफीचा साक्षीदार उलटा फिरू शकतो आणि स्वतः साक्ष (statement) बदलू शकतो किंवा खोटी शपथ घेऊ शकतो. माफीच्या साक्षीदारiने जर खोटी साक्ष किंवा पुरावा दिला तर त्याला वरील गुन्ह्याखाली व खोटी साक्ष देण्याच्या गुन्ह्याखाली अटक व शिक्षा होऊ शकते. यासाठी सरकारी वकीलाने उच्च न्यायालयात अर्ज करणे आवश्यक असते. माफीच्या साक्षीदारiने पूर्ण सत्य कथन करणे आणि स्वतःकडे गुन्ह्याबद्दल व गुन्हेगारांबद्दल असलेली सर्व सत्य माहिती देणे बंधनकारक आहे असे तर साक्षीदार गुन्ह्यास पात्र ठरतो व त्याची माफी रद्द बादल ठरू शकते. हा माफीचा साक्षीदार न्यायालयाचा खटला संपेपर्यत न्यायालयीन कोठडीत असतो व त्याला पोलीस कोठडी दिली जाऊ शकत नाही. खटल्याचा निकाल लागण्यापूर्वी कोणत्याही वेळी माफीचा साक्षीदार उभा केला जाऊ शकतो. माफीचा साक्षीदार जरी अविश्वसनीय वाटत असला तरी गुन्हेगार व गुन्हेगाराविरुद्ध पुरावे व साक्षीदार नसलेल्यास गुन्हेगाराचे निराकरण करण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी बऱ्याचदा उपयोगी ठरतो. माफीचा साक्षीदार गंभीर गुन्ह्यात माहिती देण्यास आणि गुन्हेगारी कटाबद्दल माहिती प्राप्त करण्यासाठी आणि न्यायालयात तो गुन्हI सिद्ध करण्यासाठी मदत होते. या वेबसाइटवरील सर्व माहिती चांगल्या हेतूने आणि केवळ सामान्य नागरीकांच्या माहितीसाठी प्रकाशित केली गेली आहे. अ‍ॅड. आलोका अ. नाडकर्णी