पुन:र्धैय दिवस

मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे परिपत्रक क्रमांक डिजीपी/23/54/ग्रिव्हीअन्स/1112/ दिनांक 22 जून, 2012 पोलीस ठाण्यांमध्ये ब-याचवेळा महिलांचे तक्रारी अर्ज प्राप्त होतात व त्या वेळेस पोलीस स्टेशन येथे दोन्ही पक्षांना बोलाविल्यानंतर त्यांच्यामध्ये समेट/तडजोड होउन अर्जदाराच्या तक्रारीचे निवारण होते किंवा गैरअर्जदारावर कायदेशीर कारवाई होते. परंतू काही प्रकरणांमध्ये सदर महिलेला गैरअर्जदार/संबंधितांकडून पुन्हा त्रास होतो. त्याकरीता आयुक्तालयात पुनःधैर्य योजनेस प्रारंभ करण्यात आलेला आहे.(संदर्भ परिपत्रक क्रमांक पोआ मिभाववि/वाचक/महिला तक्रार निवारण दिन/454/2022, दिनांक 27/12/2022) पोलीस स्टेशनमध्ये मागील एक वर्षात प्राप्त तक्रारीं मधील तक्रारदार महिलांची यादी तयार करुन त्यांना शनिवारी बोलाविण्यात येते व त्यांना पुन्हा काही त्रास/तक्रार आहे का याबाबत महिला अधिकारी /अंमलदार यांचे मार्फत विचारणा करण्यात येते, जर महिलेला तक्रार असल्यास विरोधक/गैरअर्जदार यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करुन महिला तक्रारदाराचे तक्रारीचे निरसन करण्यात येत असते. सदरचा उपक्रम हा महिला अधिका-यांमार्फत राबविण्यात येतो. विभागीय सहायक पोलीस आयुक्त हे या उपक्रमावर पर्यवेक्षण करतात व परिमंडळीय पोलीस उप आयुक्त हे या उपक्रमाबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करुन देखरेख ठेवतात.