ई-अभिप्राय

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या १०० दिवस कृती आराखड्याच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत, "ई-अभिप्राय" हा नाविन्यपूर्ण उपक्रम मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत, 19 पोलीस ठाण्यात क्युआर कोड स्टँडी बसवण्यात आले आहे. ज्याद्वारे नागरिक पोलीस ठाणे भेटीच्या वेळी त्यांना आलेल्या अनुभवाबाबत पोलीस ठाणेच्या सेवेसंबंधी त्वरित अभिप्राय देऊ शकतील. हा उपक्रम पारदर्शकता वाढवून पोलीस-जनता संबंध अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
सदर उपक्रमाचे उद्घाटन बुधवार दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी, "संवाद हॉल" येथे मा. पोलीस आयुक्त श्री. मधुकर पाण्डेय सर यांच्या हस्ते पार पडले.