आय-बाईक

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने गंभीर गुन्ह्यांच्या घटनास्थळी फॉरेन्सिक पुरावे तात्काळ आणि अचूकपणे गोळा करण्यासाठी आय-बाईक (Investigation Bike) फॉरेन्सिक टीमची स्थापना केली आहे. नवीन कायद्यानुसार, सात वर्षे व त्याहून अधिक शिक्षेचे गुन्हे असलेल्या घटनांवर फॉरेन्सिक टीमची उपस्थिती अनिवार्य असल्याने, ९ एप्रिल २०२५ रोजी मा. पोलीस आयुक्त यांच्या हस्ते तीन परिमंडळांसाठी प्रत्येकी एक आय-बाईक व फॉरेन्सिक किटसह ही सेवा कार्यान्वित करण्यात आली. प्रशिक्षित पोलीस अंमलदार घटनास्थळी शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास करून भौतिक पुरावे गोळा करून मा. न्यायालयास शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी होऊन गुन्ह्याचे दोषीसहितप्रमाण वाढण्यास उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमामुळे दोषसिद्धीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढून न्यायदान प्रक्रिया अधिक प्रभावी व पारदर्शक होईल.