लोक तक्रार निवारण दिवस

मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे परिपत्रक क्रमांक डिजीपी/23/54/ग्रिव्हीअन्स/1112/ दिनांक 22 जून, 2012 अन्वये आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाणेस दर शनिवारी सकाळी 10:00 ते 11:30 या कालावधीमध्ये तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येत असतो.
तक्रार निवारण दिन च्या दिवशी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस ठाणे नेमणूकीतील जास्तीत जास्त तपासी अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाण्यामध्ये हजर राहतात, त्यामुळे जास्तीत जास्त तक्रारदारांचे तक्रारींचे निरसन करण्यात येते.
तसेच विभागीय सहारूरूक पोलीस आयुक्त हे देखील सदर तक्रार निवारण दिनाच्या दिवशी विभागातील एक पोलीस ठाण्यामध्ये हजर राहून नियंत्रण ठेवतात.
परिमंडळीय पोलीस उप आयुक्त हे जनतेला भेटण्यासाठी सोमवार ते शुक्रवारी दुपारी 04:00 ते 06:00 या कालावधीत त्यांचे कार्यालयामध्ये हजर असतात, तसेच तक्रारदारांच्या तक्रारींचे निरसन करतात.